Share

वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागलेली आहे .नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या असे वक्तव्य केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रवेशाचे वेध लागलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर ही टीका केली आहे . त्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बोलत होत्या . यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे जगजितसिंह राणा यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, आजकाल वंशाचे दिवे असणाऱ्यां वडिलांचे काय होते यापेक्षा स्व:तचा विचार करतात. आपल्या करियरसाठी ते त्यांना ढकलून द्यायलाही तयार होतात. अशा वंशांच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या बापाला कुणापुढे झुकायला तरी लावत नाहीत. कुठल्याही वडिलांना असा दिवस बघायची वेळ येऊ नये. ज्या वडिलांचे उभे आयुष्य ताठ मानेने जगण्यात गेले, आज त्यांची अवस्था पाहा. मात्र, त्यांची घालमेल मुलाला कळत नाही. ठेकेदरीसाठी मुलाने वडिलांना दुसऱ्या पक्षात जायला भाग पाडले, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे.

दरम्यान जगजितसिंह राणा पाटील हे पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहे. पद्मसिंह पाटील हे पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे पाटील घराण्याचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!