Share

तयारी विधानसभेची : ईव्हीएम मशीन्स कडेकोट बंदोबस्तात पुण्यात पोचली

Published On: 

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कडेकोट बंदोबस्तात पुण्यात पोचली आहेत. वखार महामंडळाच्या गोदामात सध्या त्यांची प्राथमिक तपासणी सुरु आहे. पुणे जिल्ह्यात ८ हजार १०० मतदान केंद्र असून त्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रासह एकंदर २६ हजार ४४० ईव्हीएम आणली आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातल्या २१ मतदार संघातली मतदारांची अंतिम यादी आज प्रसिद्ध झाली. जिल्ह्यात एकंदर ७५ लाख ८६ हजार ६३६पात्र मतदार असून चिंचवड मतदार संघात सर्वाधिक म्हणजे ५ लाख १६ हजार ८३६ मतदार आहेत तर सर्वात कमी म्हणजे २ लाख ८२ हजार ८३२ मतदार आंबेगाव मतदार संघात आहेत .

मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नव्यानं मतदारांच्या नोंदणीचं काम सुरूच राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!