Share

Lunar Eclipse | खगोलप्रेमींसाठी 8 नोव्हेंबरला दिसणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून खगोलप्रेमींना खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या भौगोलिक घटना असून त्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण झाले होते, तर आता हे दुसरे ग्रहण 15 दिवसात लगेचच पार पडणार आहे. ज्योतिष शास्त्राचे मते 15 दिवसांच्या आत दोन ग्रहण लागणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा स्थितीत वर्षाचे शेवटच्या चंद्रग्रहणाचा काही राशींवर अशुभ तर काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे.

कधी आहे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse)

8 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, देशातील पूर्वेत्तर भागात सर्वाधिक 98% म्हणजेच 3 तास, तर पश्चिम भारतामध्ये केवळ 15 मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येऊ शकते. 8 नोव्हेंबर रोजी दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथील काही भागात देखील दिसेल.

हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) कधी आणि कुठे दिसेल

8 नोव्हेंबर रोजी दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथील काही भागात देखील दिसेल. अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल पण चंद्र क्षितिजावर असल्याने ते पाहता येणार नाही. दरम्यान, उर्वरित भारतामध्ये हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. भारतीय वेळेनुसार 8 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 32 मिनिटांनी छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तर, 2 वाजून 39 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरुवात होईल. त्याचबरोबर 3 वाजून 46 मिनिटांनी खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल तर 5 वाजून 11 मिनिटांनी खग्रास ग्रहण संपेल.

महाराष्ट्रातील चंद्रग्रहणाच्या वेळा

प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक व स्काय वॉच समूहाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये पुढील वेळेप्रमाणे चंद्रग्रहण दिसेल.

  • गडचिरोली – गडचिरोली येथून 5 वाजून 29 मिनिटाला ग्रहणाला सुरुवात होईल तर 7 वाजून 26 मिनिटांनी ग्रहण संपेल.
  • चंद्रपूर – चंद्रपूर येथे 5 वाजून 33 मिनिटांनी ग्रहण दिसेल.
  • जळगाव – जळगाव येथे 5 वाजून 50 मिनिटांनी ग्रहण दिसेल.
  • पुणे – पुण्यामध्ये 5 वाजून 57 मिनिटांनी ग्रहण दिसेल.
  • नागपूर – 5 वाजून 32 मिनिटांनी नागपूरमध्ये ग्रहण दिसेल.
  • यवतमाळ – यवतमाळ येथे 5 वाजून 36 मिनिटांनी ग्रहण लागेल.
  • नाशिक – 5 वाजून 55 मिनिटांनी नाशिक शहरामध्ये ग्रहण दिसेल.
  • मुंबई – 6 वाजून 1 मिनिटांनी मुंबईमध्ये ग्रहण दिसेल.

शेवटचे चंद्रग्रहण जगात कुठे दिसणार ?

2022 या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण भारत, दक्षिण आणि पूर्व युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागर याशिवाय अनेक आशियाई बेटांवर दिसू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!