टीम महाराष्ट्र देशा : नेवासा न्यायालयाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांचा जामीन मंजूर केला आहे. नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या रास्ता रोको आंदोलन प्रकरणी गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नेवासा न्यायालयाने शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिलेला असल्याने न्यायालय गडाखांच्या बाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
दोन वर्षापूर्वी पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माजी आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली वडाळा बहिरोबा येथील नगर-औरंगाबाद महामार्गावर करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजले होते. गडाख यांचे हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत पार पडूनही त्याला मिळालेला व्यापक प्रतिसाद मिळाल्याने अस्वस्थ बनलेल्या त्यांच्या राजकीय विरोधकांनी राजकीय शक्ती पणाला लावून पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून त्यांच्यासह अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पडल्याची चर्चा होती. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1957चे कलम 37(1)(3) चे उल्लंघन तसेच 135 प्रमाणेचा आदेशाचा भंग म्हणून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. गडाख यांच्यासह कॉम्रेड बाबा आरगडे, बन्सी सातपुते, सुनील गडाख, संभाजी माळवदे, भाऊसाहेब मोटे, नानासाहेब तुवर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते.
याप्रकरणी वारंवार आदेश देऊनही गडाख यांच्यासह काही आंदोलक न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहत नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात येऊन अटक वॉरंट निघाले होते. यानंतर गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सोनई, शनिशिंगणापूर, नगर परिसरात एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे राबविलेली शोध मोहीम सर्वसामान्यांना आचंबित करणारी ठरली. याच दरम्यान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या नगर येथील निवासस्थानाची घेतलेल्या झडती प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून जाऊन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने गडाख यांना 31 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्यासाठी निर्वाणीचा इशारा देऊन शेवटची संधी दिलेली असल्याने याप्रकरणीच्या घटनाक्रमाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
जामीन मिळाल्यावर माध्यमांशी बोलतांना गडाख यांनी, 4 महिन्यापूर्वी या प्रकरणी मला वॉरंट निघाले होते. परंतु अतिशय नियोजनपूर्वक लोकप्रतिनिधींनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून वॉरंट आपल्यापर्यंत पोहचू दिले नसल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसानी एल सी बी मार्फत मी नगरच्या निवसस्थानी नसतांना घराची झाडाझडती घेतली. मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील गुन्हे काढून घेतली जातील असे सरकारने जाहीर केले होते. कायद्याचा आदर करून रीतसर जामीन घेतला आहे. ज्या ज्या वेळेस पाटपाणी प्रश्न असो की शेतकरी अडचणीत येईल त्यावेळेस शांत न बसता आंदोलन करण्याचा निर्धार शंकरराव गडाख यांनी बोलून दाखविला.
- उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणा पाटलांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
- तयारी विधानसभेची : ईव्हीएम मशीन्स कडेकोट बंदोबस्तात पुण्यात पोचली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

