टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबताना दिसत नाहीये. आता पवार कुटूंबाचे नातेवाईक आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याची घोषणा केली आहे. उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पाटील यांनी घोषणा केली आहे. राणाजगजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं यामुळे स्पष्ट झाले आहे.
राणाजगजितसिंह हे माजीमंत्री पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.मात्र आता खुद्द राणा पाटील भाजपमध्ये जाऊ इच्छित आहेत. आणि त्या बाबतची घोषणा देखील राणा पाटील यांनी केली आहे.
गेले अनेक दिवस राणा जगजितसिंह पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. तर मतदारसंघातही राणा पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा होती. त्यामुळे इतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांप्रमाणे राणा पाटील यांनी देखील भाजपच्या विजयी गंगेत उडी मारली आहे. मात्र याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसणार आहे. राणा पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारंपारिक उमेदवार होते. त्यामुळे राणा पाटील यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या जिव्हारी लागणार असल्याच सांगितल जात आहे.
- वंशाच्या दिव्यापेक्षा मुलीच बऱ्या ;सुप्रिया सुळेंंचा राणा पाटलांना टोला
- तयारी विधानसभेची : ईव्हीएम मशीन्स कडेकोट बंदोबस्तात पुण्यात पोचली
- राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी खासदाराने दिली भाजप प्रवेशाची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

