🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-भाजप सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजप वारंवार हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे असल्याचे ठणकावून सांगत आहे. त्याचबरोबर शिवसेनेतील बंडखोर आमदार आहे आम्ही शिवसेनेतच आहोत शिवसेना हा आमचा पक्ष आहे असा दावा करत आहेत.
दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडे पक्षाचे गटनेतेपद व पक्षप्रतोदपद आल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट शिवसेनेच्या १४ आमदारांनाच नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये आमदारांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत व सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात पक्षाचा व्हीप मोडला असल्याचे सांगितले आहे. मात्र या दरम्यान शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली परंतु यामध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे बंडखोर आमदार व शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं तेच आम्ही केलं आहे. आम्ही सर्वच विसरलो नाही. मुख्यमंत्र्यांननी सांगितलं आदित्य ठाकरेंना बाजूला ठेवून 14 जणांना नोटीस द्या. म्हणून दिली, असं गोगावले यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी कोर्टातील अपात्रतेच्या नोटीशीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाच, सहा दिवस बाकी आहे. 11 तारखेला दूध का दूध पानी का पानी होईल. आमच्याकडे येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. कमी होणार नाही. वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे हा पाहून इतरांनी निर्णय घ्यावा, असे गोगावले म्हणाले.
संजय राऊतांवरही केली कडाडून टीका
‘राऊतांमुळे बंडखोरीची वेळ आली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बराचसा अवधी दिला होता. आम्ही वाट पाहत होतो. पण हे आमच्या लोकांची पदे काढून घेत होते. राऊतांची विधाने काळजाला घरं पाडणारी होती. काळजाला चरे पडत होते. नार्वेकरांना चर्चेला पाठवत होते आणि दुसरीकडे पदे काढून घेतली जात होती. तर राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला मजबुरीने हालचाली सुरू कराव्या लागल्या, असाही खुलासा यावेळी गोगावलेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
