सातारा : राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर एकनाथ शिंदे गटातील आघडीवर असलेले आमदार शंभूराजे देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही, अशी घणाघाती टीका देसाई यांनी केली आहे.
तसेच पुढे देसाई म्हणाले कि, खासदार संजय राऊत यांनी पक्षांमध्ये वेळोवेळी केलेली ढवळाढवळ आणि आमदारांना दिलेली दुजाभावची वागणूक याचं घटनेला विरोध करत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. पैसे घेतल्याचा पुरावा द्यावा राजकारण सोडुन घरी बसेन. त्यामुळे आम्ही संजय राऊतांच्या कोणत्याही वक्तव्याला जास्त किंमत देणार नाही असे देखील ते म्हणाले.
तर राज्यांमध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील असे भाकीत करणाऱ्या खासदार शरद पवारांच देखील सत्य नसून शरद पवार जे बोलतात ते कधीच पूर्ण होत नाही हे अनेकदा अनुभवायला आल आहे, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत आपण शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील का झालो याबद्दलच्या अनेक घटना पत्रकारांसमोर सांगितल्या.
महत्वाच्या बातम्या


