Share

‘वादग्रस्त बोलतात त्यांना संरक्षण मिळते अन् लगेच पद्मश्री मिळतो’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन तिच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. त्यांच्यावरही टीका करण्यात आली. यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कंगना आणि विक्रम गोखलेंचा खरपूस समाचार घेतला आहे.

स्वातंत्र्य सहज मिळालं असं नाही. पण महात्मा गांधींचा जो सत्याग्रहाचा विचार होता त्याच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आजही जिथं जिथं चळवळ चालते तिथं तिथं महात्मा गांधींचं नाव घऊनच चळवळ चालते, अन् ही म्हणते स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली आहे. 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. कसलं स्वातंत्र्य मिळालं 2014 मध्ये? हे बोलणे निव्वळ वेडेपणाचे लक्षण आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

बेताल वक्तव्य करणार आणि यांना कोणी काय बोलू नये म्हणून 40 बॉडिगार्ड देतात. एवढं संरक्षण मिळतं. अन् लगेच पद्मश्री पुरस्कार पण लगेच मिळतो. त्यात सामील झाले विक्रम गोखले. त्यांना पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान, हे आज स्वातंत्र्यावर बोलले, स्वातंत्र्यावर पण बोलले आता उद्या हे आपल्या राज्यघटनेवर बोलतील. हे स्वातंत्र्य भीक म्हंटल आता राज्यघटना बोगस आहे, आम्हाला कशाला दिला मताचा अधिकार, असं म्हणायची हिंमत करतील. जेव्हा राज्यघटनेवर बोलतील तेव्हा आपण जे काही कमवलं ते सगळं संपणार आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!