Share

एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये- बाळासाहेब थोरात

Published On: 

अहमदनगर : आज माध्यमांशी संवाद साधत असतांना ज्यांनी एअर इंडिया विकली,रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार नाही, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी भाजपवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना थोरात म्हणाले की,’एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपणूक करत आहोत. या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री या प्रश्नात लक्ष घालत असून त्यावर काही ना काही मार्ग निघेलच. काही लोक एसटीचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे उघड आहे. ते सर्वांनाच दिसत आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना कंगना आणि अभिनेते विक्रम गोखलेंवर टीका करत थोरात म्हणाले की,’कंगना रणौत काय बोलते? स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का? कंगनाचे बोलणे चुकीचे आहे. वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते. पद्मश्रीही मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहेत. त्यांनाही पद्मश्री मिळून जाईल’, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!