मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून गेल्या चौदा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते धरणे आंदोलन करत आहेत. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण ही प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. आता राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना रोखले जात आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
भातखळकर ट्विट करत म्हणाले, संपकरी एसटी कर्मचारी मुंबईकडे येत असताना टोलनाक्यावर गाड्या अडवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांकरवी दडपशाही करून आंदोलन दडपू बघणाऱ्या महा वसुली आघाडी सरकारचा तीव्र निषेध. अशा शब्दात भातखळकरांनी टीका केली आहे.
संपकरी एसटी कर्मचारी मुंबईकडे येत असताना टोलनाक्यावर गाड्या अडवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांकरवी दडपशाही करून आंदोलन दडपू बघणाऱ्या महा वसुली आघाडी सरकारचा तीव्र निषेध. pic.twitter.com/btkmMudJ3q— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 20, 2021
राज्य सरकारला अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यास यश आले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी दाखल होत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत इथून हालनार नाही, असा पावित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
- पीएम केअर फंडातून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी मदत करा- संजय राऊत
- ‘पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’…’, क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर हल्लाबोल
- ‘कितीही प्रयत्न करा मुंबई महानगरपालिकेवरुन शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही’
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

