Share

‘ही तर मद्य विकास आघाडी’; दारू स्वस्त करण्यावर भाजपची टीका

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली. अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली.

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीला मद्य विकास आघाडी सरकार म्हंटलं आहे.

ज्ञानोबा, तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठी निर्णय घेतले जातात. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, एसटी कर्मचारी संपावर आहेत. पेट्रोल-डिझेलला कोणती सवलत नाही. दुसरीकडे दारुला मात्र विशेष सवलत दिली जाते आहे. या राज्यात गेल्या 2 वर्षापासून राक्षसी सत्ता राज्य करत आहे. हे महाविकास आघाडीचं नाही तर मद्य विकास आघाडीचं सरकार आहे हे सिद्ध झालं आहे, असं तुषार भोसले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!