🕒 1 min read
मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे(Babasaheb Purandare) यांचे १५ नोव्हें.रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामनाच्या ‘रोखठोक’मधून बाबासाहेब पुरंदरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी शिवशाहीचा इतिहास येत असे. तो आयुष्यभर शरीराचा, मनाचा भाग बनून राहिला. बाबासाहेबांसारखा शिवभक्त होणे नाही’, असे राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’शिवाजी महाराजांची महती सांगताना आज अनेकदा हिंदू-मुसलमान अशी दरी निर्माण केली जाते. बाबासाहेबांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्याख्यानात जाती, धर्मद्वेषाचा लवलेश नसे. कोणत्याही व्यक्तीची निंदा नसे. मधल्या काळात महाराष्ट्रात जाती-पातीचे विषारी प्रवाह उसळून आले. काही जातीय संघटना, पुढाऱ्यांनी बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध मोहिमा राबवल्या. त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. बाबासाहेब हे कडवट हिंदुत्ववादी होते, पण ते कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेशी बांधील नव्हते, पण पुण्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले तेव्हा त्या पार्थिवाचा ताबाच जणू काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी घेतला. पार्थिवाच्या आसपास निवडक काळ्या टोप्या दिसू लागल्या. तेव्हा अनेकांनी नाराजी व्यक्त केली. बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांच्यावर अकारण चिखलफेक सुरू होती तेव्हा यापैकी कोणीच बाबासाहेबांच्या रक्षणार्थ पुढे आले नाही. खंत अशी की, ज्यांनी बाबासाहेबांवर घाणेरड्या पद्धतीने चिखलफेक केली, मारण्याच्या आणि गाडण्याच्या धमक्या दिल्या ते लोक वाजतगाजत ‘भाजपा’त गेले! बाबासाहेबांच्या मोठेपणाचे कोणी कधीच काही वाकडे करू शकले नाही’, असेही राऊतांनी लेखात नमूद केले.
दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की,’घटना कधीकाळी इतिहासात घडल्या, पण बाबासाहेबांना मात्र त्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसत होत्या. ‘शिवचरित्र’ सांगताना त्यांनी अफझलखान पिंवा औरंगजेबाची खोटी निंदा कधी केली नाही. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या दुश्मनांचे खरे आणि श्रेष्ठ गुणही मुक्तकंठाने सांगितले. अफझलखानाच्या लहानमोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते, तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील महंमद नुश्रतीसारख्या शाही इतिहासकारानेही दिलेली आढळत नाही. ‘शिवचरित्र’ हाच त्यांचा ध्यास होता, तेच त्यांचे व्रत होते. ‘शिवचरित्र’ सांगताना त्यांनी कधीच कोणाचा अनादर केला नाही. त्यांच्या वागण्यात, वावरण्यात, बोलण्यात एक खानदानी डौल होता. इतिहासाचे खानदान आणि डौल आता संपला आहे.’
महत्वाच्या बातम्या:
-
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- …म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते- संजय राऊत
- ‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं- सचिन सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
