Share

VIDEO : ऑस्ट्रेलियाला मिळाला त्यांचा जसप्रीत बुमराह; अ‍ॅक्शन पाहून सर्वच झाले अवाक्!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची गणना आज जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. बुमराहची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचे यॉर्कर. बुमराहची अॅक्शन इतर गोलंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या अॅक्शनमुळे, तो कोणत्याही विकेटवर फलंदाजांना अडचणीत आणतो. गोलंदाजांचे त्यांच्या अॅक्शनसारखे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पण आता एका सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने हुबेहुब बुमराहसारखी गोलंदाजी अ‍ॅक्शन केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेतील शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरिया यांच्यात खेळला गेला, जो अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यादरम्यानच व्हिक्टोरियाचा गोलंदाज निक मॅडिन्सनने जसप्रीत बुमराहच्या अ‍ॅक्शनमध्ये गोलंदाजी केली. तसे, मॅडिन्सन हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. पण या सामन्याच्या शेवटी त्याने वेगवान गोलंदाजीत हात आजमावला. मात्र, बुमराहच्या अ‍ॅक्शनमध्ये चेंडू टाकताच मॅडिन्सनच्या सहकाऱ्यांनाही हसू आवरता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!