Share

अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात आंबेडकरांची प्रतिमा लावून…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: या महाराष्ट्राचा तळपता इतिहास सांगणारा माणूस जागा असला पाहिजे. तशी शपथ घेऊन आपण इथून निघायचं आहे. शिवजयंती जशी साजरी केली. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी झाली पाहिजे. महाराष्ट्राला ज्यांनी ज्यांनी दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र जिवंत आहे, हे देशाला कळलं पाहिजे. असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात केले. यानंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (NCP leader Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

“त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावुन रोज दर्शन घ्यावे आणि मग आम्हाला बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे सल्ले द्यावेत, आणि शक्य झाल्यास संविधानातील “धर्मनिरपेक्षता” समजुन घ्यावी. तोंडाचा भोंगा आपोआप बंद होईल.”, असा खोचक सल्ला अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दिला आहे.

तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानेही एका वेगळ्याच चर्चांना उधान आले आहे. यावरही अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “ते स्वतःहून भेटीला आले नसावेत, नवीन घर बांधल्यानंतर घराला सोयीनुसार भेट द्या ह्या आर्जव विनंतीला मान देऊन सहज चहापाण्याला आलेत. आणि आता चालीसा कसा गायचा ही कार्यशाळा , तरीही हाती काही लागणार नाही.” असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“…तर आम्ही एक मिनिटात पलटी मारतो”; सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!

“राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

“भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

“राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?”; आव्हाडांचा सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!