🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२च्या ११व्या सामन्यात मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा ५४ धावांनी पराभव केला. सीएसकेचा या मोसमातील लीगमधील हा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पंजाबने टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे, तर सीएसके नवव्या स्थानावर घसरली आहे. पंजाबने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. ते चौथ्या स्थानावर आहेत.
अव्वल क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ आहे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि तिसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स आहे. मात्र धावगतीच्या बाबतीत तिन्ही संघ पंजाबपेक्षा वरचढ आहेत. दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर, लखनऊ सुपर जायंट्स सहाव्या स्थानावर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सातव्या स्थानावर आहे.
रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आठव्या स्थानावर आहे, मुंबईने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही. त्यांनी आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज नवव्या स्थानावर घसरला आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद दहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात आंबेडकरांची प्रतिमा लावून…”
- मनसेने शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून केला उल्लेख; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- उद्यापासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार; तब्बल ५९ वर्षांनी मिळालाय सातारकरांना मान!
- “…तर आम्ही एक मिनिटात पलटी मारतो”; सुजय विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
- VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
