अहमदनगर : भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या हटके वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत, आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही एक मिनिटात पलटी मारू” असं वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
‘ज्या पक्षासाठी आम्ही पंतप्रधान मोदींविरोधात पाथर्डी तालुक्यात मोर्चा काढला. तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का? नाही देऊ शकला. म्हणून आम्ही पलटी मारली.’ असं सुजय विखे पाटील म्हणाले.
माणूस एका कुटुंबाविरोधात, एका वैचारिकते विरोधात आजीवन लढला म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढला म्हणून अन्याय व्हावा, हा अन्याय आम्हाला मान्य नाही. आमचा गट जिवंत ठेवतो. आमचे कार्यकर्ते जिवंत ठेवतो. ज्या दिवशी विखेंचे कार्यकर्ते संपतील त्या दिवशी शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही, असे परखड मतही सुजय विखे यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या –


