🕒 1 min read
मुंबई : प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा सातारा (Satara) जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे. तब्बल ५९ वर्षांनी या स्पर्धेचा मान साताऱ्याला मिळाला आहे. १९६३मध्ये ही स्पर्धा साताऱ्यात झाली होती.
५ एप्रिल ते ९ एप्रिल ह्या दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी ही स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यंदा ३६ जिल्ह्यातील ४५ संघ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात एकूण ९०० मल्लांचा समावेश असेल. यावेळी ५० हजार प्रेक्षक बसतील एवढी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ह्या मैदानात ३ मातीचे व २ मॅटचे असे एकूण ५ आखाडे तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातील स्पर्धकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
राज्यभरातील कुस्तीपटू आज सातारा येथे दाखल होणार आहे. येथे त्यांचे नाव, वजन नोंदणी, वैद्यकीय तपासणी आणि इतर तांत्रिक बाबी आज दुपारी ४ नंतर पूर्ण करून घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : करियरच्या शेवटच्या मॅचमध्ये रॉस टेलरला अश्रू अनावर; रडता रडता सोडलं मैदान!
- “राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत…”, रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
- “भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम…”, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?”; आव्हाडांचा सवाल
- “राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” – गुलाबराव पाटील आक्रमक
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
