Share

AUS vs SL : नॅथन लायनचा वर्ल्ड रेकॉर्ड..! दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नची केली बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायनने श्रीलंकेविरुद्धच्या (AUS vs SL) पहिल्या कसोटीत शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. लायनच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने लंकेला २१२ धावांत गारद केले. लायनसाठी कसोटी कारकिर्दीतील २० वेळा अशी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये २० किंवा त्याहून अधिक वेळा ५ बळी घेणारा लायन आता ऑस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. शेन वॉर्न (३७), ग्लेन मॅकग्रा (२९), डेनिस लिली (२३) आणि क्लेरी ग्रिमेट (२३) नॅथन लायनच्या पुढे आहेत.

नॅथन लायनने नवव्यांदा आशियाई खेळपट्टीवर एका डावात ५ विकेट घेतल्या. या आकड्यांसह त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेव वॉर्नची बरोबरी केली आहे. वॉर्नने आशियामध्ये ९ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या डावात लायनने २५ षटकांत ९० धावांत ५ बळी घेतले.

लंकेविरुद्ध ५ विकेट्स घेत लायन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या बाबतीत १२व्या क्रमांकावर पोहोचला. त्याने सर रिचर्ड हॅडली यांना मागे टाकले. आता तो रंगना हेराथची (४३३) बरोबरी करण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. लवकरच तो कपिल देव यांच्या ४३४ बळींचा टप्पाही पार करेल. कपिल यांना मागे टाकल्यानंतर त्याचा कसोटी क्रिकेटमधील टॉप १० गोलंदाजांमध्ये समावेश होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!