🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाने कारवाया केल्या. यावरुन केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करुन कारवाया करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. यावरुन संसदेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान (Narendra Modi) वर टीका केली.
नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदींनी ट्विट करुनही औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींच्या याच मुद्द्याचा संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला दिला आहे.
छत्रपती शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केले नाही हे इतिहासाचे ज्ञान सुप्रिया सुळेंनी संसदेत पाजळण्यापेक्षा धनंजय मुंडे आणि संजय रठोडना यांना सांगितले असते तर बरे झाले असते, असा खोचक सल्ला अतुल भातखळकरांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे.
शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केलं नाही हे इतिहासाचे ज्ञान सुप्रिया सुळेंनी संसदेत पाजळण्यापेक्षा धनंजय मुंडे आणि संजय रठोडना यांना सांगितले असते तर बरे झाले असते. pic.twitter.com/HKRUz6uoXj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 15, 2021
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी अन्यायाविरुद्ध लढले. त्यांनी आपल्या लढाईमध्ये कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी, सीबीईच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य करतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस; कारवाईची शक्यता
- ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी याचिका फेटाळली!
- आमदाराचा मी नामदार झालो; मात्र आजही मी तसाच- आ. संदीपान भुमरे
- मनात टिकटिक वाजत असताना रुपाली पाटील सोडणार का बाण?
- ‘राऊत साहेब, शेतकऱ्यांसोबत पंक्तीला बसण्यासाठी 56 इंचाची छाती लागते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
