Share

‘राऊत साहेब, शेतकऱ्यांसोबत पंक्तीला बसण्यासाठी 56 इंचाची छाती लागते’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रदधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन करण्यात आले. काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान मोदी यांनी ते बांधणाऱ्या कामगारांना कधीही न विसरता येणारी अशी भेट दिली. कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामातील मजुरांसोबत भोजन केले. यावरुन काँग्रेसचे नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्मचाऱ्यांसोबत जेवतानाचा फोटो पोस्ट करुन टीका केली आहे.

पंतप्रधानांसोबत भोजन करताना या कामगारांनी आपले कामावरचे कपडे का घालावेत? शिवाय पंतप्रधान त्यांच्यापासून इतकं अंतर ठेवून का बसलेत?, असा खोचक सवाल करत नितीन राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना आमदार सदाभाऊ खोत यांनी नितीन राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

नितीन राऊत साहेब, विजेच्या प्रश्नावर शेतकरी तुम्हाला पंक्तीला बोलावत आहेत. तरी तुम्ही एकदा वीज पंप धारक शेतकरी पंगतीचा आस्वाद घ्यावा. हे तुम्हाला शक्य नाही, कारण त्यासाठी 56 इंचाची छाती लागते आणि तसे कार्य सुद्धा करावे लागते, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!