Share

प्रविण दरेकरांना सहकार विभागाने नोटीस; कारवाईची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तसेच मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे ‘मजूर’ आहेत किंवा नाही याची उच्च पातळीवर चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याच्याही सूचना सहकार आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. या चौकशी अहवालानंतर प्रविण दरेकर यांच्या पात्र आणि अपात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना नोटीस पाठवली असून तुम्हाला अपात्र का घोषित करु नये? असा प्रश्न विचारला आहे.

प्रविण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालकपदाच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. संचालकपदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने मजूर वर्गात मोडता, अशी विचारणा सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना एक नोटीस पाठवून केली आहे. मात्र, या नोटीसमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आता यावर प्रविण दरेकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रविण दरेकर गेल्या अनेक वर्षापासून बँकेचे अध्यक्ष आहेत. मात्र, ते मजूर वर्गातूनच निवडून येतात. खरे तर मजूर सहकारी संस्थेनुसार, अंगमेहनत करणारी व्यक्ती ही मजूर म्हणून गृहीत धरली जाते. त्यामुळे आता दरेकर नमके कशा प्रकारे मजूर वर्गात मोडतात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवत तक्रार केली आहे. त्यामुळे सहकार विभागाने दरेकर यांना ही नोटीस पाठवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!