Share

आमदाराचा मी नामदार झालो; मात्र आजही मी तसाच- आ. संदीपान भुमरे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबादःआमदाराचा मी नामदार झालो. मला आजही तसाच आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांमुळे, त्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी आज याठिकाणी आहे. वैजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आढावा बैठकीसाठी आलेल्या रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे(Sandipan bhumre) यांनी मतदार संघातील गावकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, मी ज्या कारखान्यात कामगार होतो. नंतर त्याच कारखान्याचा चेअरमन झालो. मात्र अजूनही माझी नाळ जमिनीशी जुळलेली आहे. मी अजूनही गावाकडे गेल्यावर चहाच्या दुकानात जाऊन चहा पितो, पानटपरीच्या ठेल्यावर उभा राहून लोकांशी गप्पा झाडतो. या सगळ्या गोष्टीत मंत्रीपदामुळे काहीही बदल झालेले नाही, असेही भूमरे म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्री पदाचा किस्सा सांगितला, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मला पक्षश्रेष्ठींकडून रात्री फोन आला. म्हणाले आम्ही तुम्हाला राज्यमंत्री करायचे ठरवले आहे. पठ्ठ्या यातच खूष होता. मलाही हीच अपेक्षा होती. परंतु त्याच दिवशी रात्री उशीरा पुन्हा फोन आला.

तुम्हाला राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री करायचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर मी त्यांना कॅबिनेट नको तर राज्यमंत्रीच ठेवा, अशी विनंती केली. पण सांगूनही त्यांनी ऐकले नाही, असा किस्सा भूमरे यांनी सांगितल्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. मंत्री झाल्यानंतर मातोश्री पाणंद रस्ते योजनेबाबत अध्यादेशात बदल करायचा असल्याने खासगी सचिवाने प्रश्न विचारल्यानंतर आपण बुचकाळ्यात पडल्याचे भुमरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता तयार झाला पाहिजे अन् भरघोस निधी देता आला पाहिजे. असे सांगताच सचिवाने त्या पद्धतीने अध्यादेश तयार केला. असे अनेक किस्से संदीपान भूमरे यांनी सांगितले तेव्हा सभागृहात मोठमोठ्याने हशा पिकत होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!