Share

“…सल्ला फक्त हिंदूंना आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. मात्र अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ एप्रिल) रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार दावत दिली. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.  यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी शरद पवारांना (sharad pawar) टोला लगावला आहे. 

“वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. आपल्या धार्मिक श्रद्धेचे जाहीर प्रदर्शन करु नये हा सल्ला फक्त हिंदूंना. आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन होय.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान “राजधानी दिल्लीत एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार आहे. पण दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातही कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वांना मिळून तो प्रयत्न हाणून पाडावा लागेल.”, असे आवाहन करत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!