🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज बुधवारी गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) आमनेसामने आले आहेत. वानखेडे मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा, एडन मार्कराम यांची अर्धशतके आणि शशांक सिंहच्या स्फोटक खेळीच्या जोरावर हैदराबादने गुजरातसमोर १९५ धावांचा डोंगर रचला. गुजरातचा संघ सातपैकी सहा सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे खेळाडू जबरदस्त लयीत असून एका शानदार सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
हैदराबादचा कप्तान
कप्तान केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादसाठी सलामी दिली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विल्यमसनचा (५) त्रिफळा उडवत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शमीने आक्रमक वाटणाऱ्या राहुलचा (१६) अडथळा दूर केला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि एडन मार्करामने ९६ धावांची सुंदर भागीदारी रचली. अल्झारी जोसेफने १६व्या षटकात अभिषेकला बाद केले. अभिषेकने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. अभिषेकनंतर मार्करामनेही अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात यश दयालने त्याला माघारी पाठवले. मार्करामने २ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. आपला पहिला सामना खेळणाऱ्या शशांक सिंहने फिनीशरची भूमिका साकारली. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या २०व्या षटकात ३ षटकार ठोकले आणि ६ चेंडूत २५ धावा चोपल्या. हैदराबादने २० षटकात ६ बाद १९५ धावा ठोकल्या. गुजरातकडून शमीने ३९ धावांत ३ बळी घेतले.
Innings Break!
Incredible batting this by @SunRisers as they put up a total of 195/6 on the board.
Scorecard – https://t.co/TTOg8b6LG3 #GTvSRH #TATAIPL pic.twitter.com/ZeiUzzqQlA
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कप्तान), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
