🕒 1 min read
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटप्रेमींना जबरदस्त सामना पाहायला मिळाला. सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये गुजरात टायटन्सकडून (GT vs SRH) ५ गड्यांनी पराभव पत्करला. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा, एडन मार्कराम यांची अर्धशतके आणि शशांक सिंहच्या स्फोटक खेळीच्या जोरावर हैदराबादने गुजरातसमोर १९५ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात गुजरातचे पहिले पाच फलंदाज हैदराबादच्या एकट्या उमरान मलिकसमोर ढेपाळले. त्यानंतर राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी स्फोटक खेळी करत हैदराबादच्या आव्हानाचा शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पाठलाग केला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
गुजरातचा डाव
हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल ६९ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर जलदगती गोलंदाज उमरान मलिकच्या वादळाने वानखेडेवर घोंगावायला सुरुवात केली. त्याने अर्धशतक ठोकलेल्या वृद्धिमानसह साहासह पहिल्या पाच गोलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. साहाने ११ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. हार्दिक पंड्या वगळता त्याने शुबमन गिल, डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांचा त्रिफळा उडवला. उमरानने आपल्या ४ षटकात २५ धावांत ५ बळी टिपले. त्यानंतर राहुल तेवतियाने स्फोटक खेळी केली. ६ चेंडूत २२ धावांची गरज असताना गुजरातकडून राशिद खान, तेवतियाने मार्को जानसेनला चोपले. या षटकात राशिदने ३ षटकार तर तेवतियाने एक षटकार मारला. तेवतियाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४० तर राशिदने २२ चेंडूत ४ षटकारांसह नाबाद ३१ धावांची खेळी केली आणि सामना गुजरातकडे झुकवला. २० षटकात गुजरातने ५ बाद १९९ धावा केल्या.
https://twitter.com/IPL/status/1519377224876535815
https://twitter.com/gujarat_titans/status/1519376547534163968
हैदराबादचा कप्तान
कप्तान केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादसाठी सलामी दिली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विल्यमसनचा (५) त्रिफळा उडवत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शमीने आक्रमक वाटणाऱ्या राहुलचा (१६) अडथळा दूर केला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि एडन मार्करामने ९६ धावांची सुंदर भागीदारी रचली. अल्झारी जोसेफने १६व्या षटकात अभिषेकला बाद केले. अभिषेकने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. अभिषेकनंतर मार्करामनेही अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात यश दयालने त्याला माघारी पाठवले. मार्करामने २ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. आपला पहिला सामना खेळणाऱ्या शशांक सिंहने फिनीशरची भूमिका साकारली. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या २०व्या षटकात ३ षटकार ठोकले आणि ६ चेंडूत २५ धावा चोपल्या. हैदराबादने २० षटकात ६ बाद १९५ धावा ठोकल्या. गुजरातकडून शमीने ३९ धावांत ३ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कप्तान), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
