Share

“…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंधन दरवाढ आणि इतर कारणांनी सर्वच गोष्टींचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यात अवकाळीमुळे पिके आणि फळबागांचे नुकसान शेतकऱ्यांचाही मुळावर आले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच सरकार, प्रशासन, शेतकरी आणि सामान्य जनता अशा सगळ्यांनीच या संकटाशी एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘गेल्या वर्षी खरीपाचे पीक अतिवृष्टी, महापूर, ढगफुटीने खाल्ले. आता रब्बी हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळीचे संकट हिरावून घेत आहे. अवकाळीचे तडाखे ही आता दरवर्षीचीच आपत्ती होऊ लागली आहे. पावसाळ्यात महापूर आणि इतर ऋतूंमध्ये अवकाळी असा हा दुहेरी मार आहे. अर्थात त्यासाठी फक्त ग्लोबल वॉर्मिंगकडे बोट दाखवून चालणार नाही. सरकार, प्रशासन, शेतकरी आणि सामान्य जनता अशा सगळ्यांनीच या संकटाशी एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘राज्याच्या जवळपास सर्वच भागांत मागील दीड महिन्यापासून अवकाळीचे सावट पसरले आहे. एकीकडे ४०-४२ अंशाच्या वर चढलेला तापमानाचा पारा आणि दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस असे वातावरण पाहायला मिळत आहे. ते आणखी काही काळ तसेच राहणार असल्याने प्रामुख्याने बळीराजा चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!