🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या टीकेंना प्रतिउत्तर दिलं असून भाजप आणि शिवसेना मध्ये आरोप प्रत्यारोप वारंवार होताना दिसत होते. यावरूनच भाजपनेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाः
सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याआधी आपली लायकी बघावी, बापाचं नाव नसतं तर आपल्याला एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावं लागलं असतं, अशी झणझणीत टीका अतुल भातकर यांनी केली आहे.
अमित शहा यांचा कार्यकर्तांना आदेशः
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केवळ दोन मतांसाठी आपल्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता. तसेच राजकारणात जे लोक धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा आदेश अमित शहा यांनी यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Atul BHatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…
- Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली
- Amit Shaha | मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
