मुंबई : 1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. अनेत वेळा त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. अशातच संजय राऊत यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणीः
संजय राऊतांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या लीगल टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
तुरुंगाच्या कोठडीत संजय राऊत यांची रोजचा दिनक्रम समोर आला होता. तुरुंगात संजय राऊत आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि लेखनात घालवतात. त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. कैदी क्रमांक 8959 अशी त्यांची ओळख आहे.
दरम्यान, आज सुनावणी झाली तर संजय राऊत यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जय राऊत यांना सामान्य नियमांनुसार इतर कैद्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यांना लिहिण्यासाठी पेन आणि रजिस्टर देण्यात आले आहेत. मात्र ते लिखाण तुरुंगातून बाहेर जाऊ नये, तसेच कारागृहात काय लिहितात, याची पुरेपूर काळजी कारागृह प्रशासन घेत आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Devendra Fadnavis | “उमाजी नाईक महामंडळ स्थापन अन् …”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
- Chandrasekhar Bawankule | शरद पवारांनी मोदींच्या नादू लागू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
- Shahaji Bapu Patil । शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला ‘त्या’ निवडणुकीचा किस्सा
- Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


