🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाश शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून राज्यातील राजाकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आपल्याला माहित आहे की, केंद्रीय तपास यंत्रणा अतिशय सक्रिय आहेत. तपास यंत्रणा राजयकीय नेत्यांवरही कारवाई करत आहेत. अशातच शिवसेना पक्षाने आपल्या अग्रलेख सामना मधून आयकर विभागाच्या धाडींवर वक्तव्य केलं आहे.
शिवसेना पक्षाच्या सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे?
आयकर खात्याच्या धाडी निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार मान्यता आणि नोंदणी नसलेल्या राजकीय पक्षांच्या ‘फंडिंग’बाबत असतील, असं शिवसेना पक्षाने सामना अग्रलेखात म्हटलं आहे.अशा प्रकारच्या धाडी जनतेच्या दृष्टीने विश्वासार्ह राहिलेल्या आहेत काय?, असा सावलही शिवसेना पक्षाने याठिकाणी केला आहे.
आयकर विभागाने बुधवारी देशभरात एकाच वेळी सुमारे 110 पेक्षाही अधिक ठिकाणी धाडी मारल्या. आयकर खाते काय किंवा इतर यंत्रणा काय, त्यांच्या धाडींमध्ये नवीन काही राहिलेले नाही. त्यातही गेल्या सात-आठ वर्षांत त्यामध्ये एकप्रकारचे सातत्य आणि सूत्र दिसून येत आहे. म्हणजे एखाद्या धाडीचेही एकप्रकारचे ‘कॅम्पेन’ चालविलं जात असल्याचं म्हटलं आहे.
पुढे अग्रलेखात असंही म्हटलं आहे. कारवाईचा फुगा खूप फुगविला जातो, पण नंतर एकतर हळूहळू त्याच्यातील हवा निघून जाते किंवा कार्डिलिया क्रूझ प्रकरणाप्रमाणे फटकन फुगा फुटतो, अशा अनेक कारवायांचे सरकारचे हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नव्हते हे जनतेलाही कळून चुकले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “उमाजी नाईक महामंडळ स्थापन अन् …”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
- Chandrasekhar Bawankule | शरद पवारांनी मोदींच्या नादू लागू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
- Shahaji Bapu Patil । शरद पवारांची एका निवडणुकीत दमछाक झाली होती; शहाजी बापूंनी सांगितला ‘त्या’ निवडणुकीचा किस्सा
- Parth Pawar । अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
