मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केला होता. या दौराच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी चूक झाली असल्याची बातमी समोर आली आहे. एक व्यक्ती संशयितरित्या शहा यांच्याजवळ फिरत असल्याचे दिसून आलं आहे.
अमित शहा यांच्या सुरक्षेत चूकः
अमित शहा दोन दिवस मुंबईमध्ये आले होते. यावेळी लालबागच्या राज्याचं दर्शन घेऊन भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. यादरम्यान एक व्यक्ती शहा यांच्या जवळ पोहोचली होती. बराच वेळ ही व्यक्ती त्यांच्यासोबत भटकत होती. हेमंत पवार असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
संबंधित व्यक्ती हा धुळे येथील रहिवासी आहे. आंध्र प्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचं हेमंत पवार याने सांगितलं आहे. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असता अमित शहा यांच्या जवळ जाण्याचं कारण पोलीस तपासत आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अमित शहा यांनी या दौऱ्यामध्ये रणसिंग फुकलं आहे. भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व नेत्यांना आदेश देण्यात आले असून दीडशे जागांचं टारगेट देण्यात आलं आहे. शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला, राजकारणामध्ये धोका सहन करू नका, जे राजकारणात धोका देत असतात त्यांचे राजकारण यशस्वी होत नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असं यावेळी अमित शहा यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- Devendra Fadnavis | “उमाजी नाईक महामंडळ स्थापन अन् …”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- PAK VS AFG । मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट
- Chandrasekhar Bawankule | शरद पवारांनी मोदींच्या नादू लागू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा


