मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर ८ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सामोरे जात त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला होता.
दरम्यान या हल्ल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी औरंगाबाद येथे बोलताना मोठे वक्तव्य केले. म्हणाल्या, सिल्व्हर ओक हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता आणि माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सिल्व्हर ओक हल्ल्याचा विषय चर्चेत आला आहे.
हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया –
“मी मुंबई पोलिसांचे आभार मानते. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत हे असं पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. माझी हात जोडून विनम्रपणे विनंती आहे. आपण चर्चेला बसू, शांतपणे चर्चा करू. आपण तोडगा काढू” अशी याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यासह आमच्या घरावर हल्ला झाला, मुंबई पोलिसांनी आम्हाला सुरक्षित ठेवलं त्याबद्दल मी आभारी आहे असे बोलून मुंबई पोलिसांचेही आभार मानले होते.
महत्वाच्या बातम्या –


