🕒 1 min read
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का ? असा खोचक प्रश्न काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी गौरव पद यात्रेनिमिताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य मंत्रीमंडळ विस्तार म्हणजे एखादा विनोद व्हावा अशी कृती दिसत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
एकाही महिलेला मंत्रीपदी संधी दिली नाही, हे आश्चर्य आहे. तर भाजप नावाची वॉशिंग पावडर चारित्र्य साफ करत असल्याने हे शिंदे-फडणवीस सरकारचे हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता भाजपच्या चित्रा वाघ यांची भूमिका काय असेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
39 दिवसांनी झाला मंत्रिमंडळाचा विस्तार –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर 39 दिवसांनी आज (9 ऑगस्ट, मंगळवार) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एकाही अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. मात्र सर्वाधिक टीका संजय राठोड यांना मंत्री करण्यात आल्याने होत आहे. संजय राठोड यांची भाजपच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | “पूजा चव्हाण यांची आत्महत्या नाही हत्या, संजय राठोड जबाबदार” ; किरीट सोमय्यांचा जूना VIDEO व्हायरल
- Supriya Sule । “संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा टोला
- Sudhir Mungantiwar – सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळातून डच्चू; शपथविधी सोहळ्याला फिरकल्याही नाहीत
- Eknath Shinde | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून व्हिडीओ कॉल करत विचारपूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
