Share

Kirit Somaiya | “पूजा चव्हाण यांची आत्महत्या नाही हत्या, संजय राठोड जबाबदार” ; किरीट सोमय्यांचा जूना VIDEO व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर 39 दिवसांनी आज (9 ऑगस्ट, मंगळवार) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्ताराच्या या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एकाही अपक्ष किंवा छोट्या पक्षाच्या आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. मात्र सर्वाधिक टीका संजय राठोड यांना मंत्री करण्यात आल्याने होत आहे. संजय राठोड यांची भाजपच्या दबावामुळे उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केली होती. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

किरीट सोमय्या यांनी केली होती राजीनाम्याची मागणी –

किरीट सोमय्या यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच पूजा चव्हाण यांची आत्महत्या नसून हत्या होती, या संजय राठोड जबाबदार होते. असा आरोप देखील सोमय्या यांनी केला होता. दरम्यान संजय राठोड यांच्यासोबत किरीट सोमय्या आता सत्तेत भागीदार आहेत.

चित्रा वाघ संतापल्या-

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, “पूजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे.”

काय आहे प्रकरण?-

बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आपली जीव दिला होता. या गूढ मृत्यू प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात उघड झाले होते. संजय राठोड व पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध असल्याचे काही फोटो व व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर देखील संजय राठोड यांनीच पूजा चव्हाणला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूर उमटला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड नॉट रीचेबल होते.

संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता-

या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले होते. हे पत्र उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!