🕒 1 min read
Devendra Fadnavis | मुंबई : 39 दिवस रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडला. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात चर्चेची दोन नावे समोर आली ती म्हणजे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार.संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती.
फडणवीस त्यावेळी म्हणाले होते कि, सर्व पुरावे असतानाही काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप केला होता. पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता, असं फडणवीस म्हणाले होते. यानंतर फडणवीसांचं हे विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे.
दरम्यान, यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा मंत्रिपद दिल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या आहेत. चित्रा वाघ म्हणाल्या, पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, असं त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Yashomati Thakur | हे ‘व्हाईट वॉश’ मंत्री मंडळ आहे का? ; यशोमती ठाकूर यांचा सवाल
- Devendra Fadnavis । वर्षभरापूर्वी संजय राठोडांवर देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका; म्हणाले होते…
- Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- Kirit Somaiya | “पूजा चव्हाण यांची आत्महत्या नाही हत्या, संजय राठोड जबाबदार” ; किरीट सोमय्यांचा जूना VIDEO व्हायरल
- Supriya Sule । “संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद”; सुप्रिया सुळेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

