🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या खूप काही सुरू आहे. शिवसेना पक्षाकडून मुंबईमधील सर्व गुजरातला नेलं जात असल्याचा आरोप भाजप सरकारवर केला जात आहे. यावरून शिवसेनेतील नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते अशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार करत निशाणा साधला असल्याचं समजत आहे.
अशिष शेलार यांचे वक्तव्य-
राज्यात इतका विकास होत असतानादेखील पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे , असं म्हणत अशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. अशिष शेलार यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना पक्षाचा पब, पेंग्विन आणि पार्टीवाली पेंग्विन, असा उल्लेख अशिष शेलार यांनी केला आहे. देशातील सर्वात जुने आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सीप्झमध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करून उभारण्यात येत आहे. यात 5 लाख रोजगार आणि 30 हजार कोटींच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. नुकतीच त्याची पायाभरणी झाली असे शेलार म्हणाले. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार आमचं ठरल असल्याचंही अशिष शेलार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला शिवसेना पक्षाकडून काय प्रत्युत्तर येतयं या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच”
- Shivsena | “हिंदुत्वाच्या पदव्या बहाल करणारे रामदेव बाबा एका आंदोलनात मध्यरात्री…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Kishori Pednekar | तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
- Ganeshotsav | अभिनेत्री अमृता खानविलकरने नेटिझन्सचे टोचले कान
- Ashok Chavan | अशोक चव्हाण सोडणार काँग्रेसचा हात? 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
