Share

Ashok Chavan | अशोक चव्हाण सोडणार काँग्रेसचा हात? 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार?

Published On: 

मुंबई : 40 आमदारांसह बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान शिवसेनेला मोठा फटका बसला. अशातच आता शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटलेः

महाराष्ट्र मध्ये सत्तांतर होऊन एक महिना देखील झाला नाही, तोच आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे राजकी चर्चांना आणखीन बळ मिळालं. आधीच केंद्रातील काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेकांचे राजीनामे पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

15 आमदारांसह भाजप पक्षात प्रवेश:

अशोक चव्हाण यांच्यासोबत 3 नेते आणि 9 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जर अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असतील तर त्यांनी 15 आमदार घेऊन यावेत, अशी अट भाजप कडून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठी खिंडार पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केला. सेनेतून बाहेर पडण्याची हालचाल शिंदेंनी आधीपासून सुरू केली होती. याच पाश्वभूमीवर आता अशोक चव्हाण देखील या हालचाली करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र चव्हाण खरच भाजप पक्षाचा हात धरणार का हे पाहणं महत्वाचं राहिल.

महत्वाच्या बातम्याः

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!