Share

Shivsena | “हिंदुत्वाच्या पदव्या बहाल करणारे रामदेव बाबा एका आंदोलनात मध्यरात्री…”, शिवसेनेचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : योग गुरु रामदेव बाबा यांनी शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. याचं प्रत्युत्तर देत शिवसेनेने त्यांचं मुखपत्र सामना यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदेव बाबा आणि भाजपवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे गौरव पुरुष असून शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार आहेत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं होतं.

शिवसेना पक्षाचा रामदेव बाबा यांच्यावर हल्लाबोलः

यादरम्यान, हेच बाबा दिल्लीतील एका आंदोलनात मध्यरात्री साडी चोळी घालून मुलींच्या पंजाबी वेशभूषेत पळून गेले होते हे, भगवडे महाराष्ट्रात येऊन पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करतात, हा महाराष्ट्राचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे, महाराष्ट्रातील या बाबागिरीचा जादूटोणा या गणेशोत्सवात नष्ट व्हावा, श्री गणेश चरणी महाराष्ट्राचा हाच नवस आहे, अशी भोचरी टीका शिवसेनेने रोखठोकमधून केली आहे.

शिंदे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदारः

रामदेव बाबा नावाचा एक तोतया व्यापारी संत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस मुंबईत अवतरला आणि त्याने शिंदेना शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार जाहीर केलं, बाबा रामदेवांची ही विधान म्हणजे संतपदास डाग आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

दरम्यान, याच बाबाने कधीतरी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांनाही हिंदुत्वाचे खरे तारणहार, असं प्रमाणपत्र दिलं होतं. अशी आठवण ही शिवसेनेने करून दिली आहे. ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्या महाराष्ट्राचा सार्वजनिक महत्त्व संपवलं जात असल्याचं देखील शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!