Share

Kishori Pednekar | तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्ष डगमळीत झाला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच याच मुद्यावर मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

किशोरी पेडणेकर यांचे वक्तव्य-

शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे राजकारणात येणार नसल्याची शक्यता नाकारली नाहीय. तेजस ठाकरेंना राजकारणात कधी लॉन्चिंग करायचं हे उद्धव ठाकरेच ठरवतील असं त्यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर बोलत होत्या.

तेजस ठाकरे राजकारणात येणार का?

तेजसची ओळख वेगळी आहे. तेजसने खेकड्यांचा शोध लावलाय. खेकड्यांना कसं वठणीवर आणायचं हे तेजसने बघितलंय. त्यांनी या खेकड्यांना वेगवेगळी नावंही दिली आहेत. ते राजकारणात एन्ट्री करतील की नाही हे त्यांचे वडील म्हणजे उद्धव ठाकरेच सांगू शकतील.पुढे पेडणेकर असंही म्हणाल्या की, पण तेजस ओजस्वी आहे, तेजस्वी आहे. त्यामुळे तेजस हे नाव राजकारणात कधी आलेच तर ते ओजस्वी रितीने काम करतील.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात त्यांना विचारले असता, शिवसेनेने महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुंबईत शिवसेना दमदारपणे उतरणार असल्याचंही त्या म्हणाल्या. 227 जागा लढवण्याबाबत हे आता म्हणतात. 236 जागांना मान्यता देणारं सर्वोच्च न्यायालय आहे. त्यापेक्षा वरचं कोर्ट मला माहीत नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!