Share

Asaduddin Owaisi : टीपू सुलतान 4 वेळा इंग्रजांशी लढले तर सावरकरांनी 4 वेळा माफी मागितली

Published On: 

हैद्राबाद : टिपू सुलतान आणि सावरकर यांच्या पोस्टरवरून कर्नाटकात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. टिपू आणि सावरकरांचे बॅनर हटवण्यावरून येथील दोन गटात हाणामारी झाली आहे. यावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी चार वेळा युद्ध केले होते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या बलिदानावर खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध जे युद्ध केले ते आम्ही विसरू शकत नाही, असे ओवेसी म्हणाले.

यानंतर पुढे ते म्हणाले कि, आज आपण पाहत आहोत की मुस्लिमांचा द्वेष करणारे लोक टिपू सुलतानबद्दल खोटे बोलत आहेत. इलियास भटकळी यांचे टिपू सुलतानवरील पुस्तक वाचण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले. टिपू सुलतान यांच्या जीवनाविषयी जाणून घेतल्यावरच कळेल की ब्रिटिशांविरुद्ध कोणाचा लढा होता आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्याचा मार्ग कोणता असावा. टिपू सुलतान यांना केवळ धर्माची माहिती नव्हे तर पारशी, अरबी, कन्नड, फ्रेंच या भाषा त्यांना लिहता आणि वाचता येत होत्या.

तसेच पुढे ओवेसी म्हणाले कि, टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध 4 युद्धे केली आहेत, तर सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीची पत्रे लिहिली आहेत. आज देशात असे लोक आहेत जे टिपू सुलतान यांचा द्वेष करतात आणि त्यांचे बलिदान पुसून टाकू इच्छितात. तसेच संविधानाच्या पुस्तकात झाशीच्या राणीच्या शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आहे. पण हे लोक (भाजप) टिपूची तुलना सावरकरांशी करतात, मात्र दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!