Share

Vinayak raut | “काही दिवसांपूर्वी पर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांनी आता…”; विनायक राऊत कडाडले

Published On: 

सोलापूर : शिवसेना खासदार विनायक राऊत हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर सडकून टीका केली. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनाही त्यांनी घेरले. “शिवसेनेने सर्वप्रथम सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी लोकसभेत केली होती. भरत गोगावले यांना स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते, हे तरी माहिती आहे का? काही दिवसांपूर्वी पर्यंत मटका आणि हातभट्टी चालवणारे गद्दार 50 खोके घेऊन एकदम ओके झालेत आणि तेच आता सावरकरांबाबत उद्धव ठाकरेंना विचारत आहेत. हा मोठा विनोदच आहे. उद्धवजी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला गेले होते. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्याचं धाडसही केवळ उद्धव ठाकरेंनी दाखवलं. त्यामुळे तुमच्या चमकेश मुख्यमंत्र्यांकडे तसं धाडस कधीच येणार नाही.”, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या काळात ज्या पद्धतीने चित्रा वाघ संजय राठोड यांच्यावर तुटून पडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राठोडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्या करत होत्या. त्यांना एवढाच प्रश्न आहे कि, आता तुम्ही कोणत्या शब्दात राठोडांना क्लिनचीट देणार? ते सांगितलं तर बरं होईल. आता चित्रा वाघ यांना मुद्दाम आंधळेपण स्वीकारावं लागेल, असं वाटत आहे. शिंदे गट आणि भाजप सत्तेत येताच संजय राठोड धुतल्या तांदळासारखे झाले आहेत. मात्र राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या चित्राताई एका बाजूला आणि आता राठोडांची भलामन करणाऱ्या चित्रा वाघ एका बाजूला आहेत.”, या शब्दात राऊत यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

शिंदे गटाच्या बॅनर्सवरही टीका

“ठाण्यात काल दहीहंडीच्या निमित्ताने अनेकांनी पोस्टर्स लावले होते. पण वर्षानुवर्षे आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेले आणि सतत बाळासाहेब आणि दिघे साहेबांच नाव घेणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो कोपऱ्यात लावला होता आणि त्याच्या अनेक पटींने मोठे फोटो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर कसा करावा याचं भान शिवसैनिकांना आहे. परंतु ज्यांनी शिवसेनेशीच गद्दारी केली ते आजही बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत.”, असं विनायक राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!