Share

Girish Bapat| देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यावर गिरीश बापट यांची प्रतिक्रीया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. याबाबत महासंघाचे गोविंद कुलकर्णी यांनी भाजप अध्यक्ष यांना पत्रही दिलं होतं. याबाबतच खासदार गिरीश बापट यांना विचारलं असता उमेदवारी देणं हे राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांच्या नेत्यांचं काम आहे. संघटना उमेदवार ठरवत नाही त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

गिरीश बापट यांची प्रतिक्रीयाः

आपली प्रतिक्रीया देत असताना राजकारणाचा स्तर घसरत असल्याची खंत गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे. 2024 साली देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून जरी लोकसभेची उमेदवारी दिली, तरी मला आनंद होईल, असं बापट यांनी म्हटलं आहे.

राज्यात दोन सरकार आल्याः

राज्यात दोन सरकार आल्या असून दोन्ही सरकारने प्रभाग रचनेंना वेगवेगळ्या निर्णय घेतला. यामध्ये निवडणूक आयुक्त, सरकार आणि कोट अशा तिन्ही एजन्सी येतात. ज्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होतील यामध्ये थोडासा गोंधळ आहे, असं बापट म्हणाले. आघाडीचे सरकार होतं त्यावेळी किरीट सोम्यान पासून नारायण राणे पर्यंत जुने विषय काढून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. राजकीय पातळी सध्या थोडी खालावली आहे. तसेच राजकारणाचा स्तर देखील घसरला आहे. सामान्य जनतेला मात्र याच्याशी काही घेणं देणं नाही. जनतेच्या मनात सर्वच राजकारण्यांच्या बद्दल नाराजी असते, माझ्यासारख्या माणसाला देखील आत्ताच राजकारण बघून अस्वस्थ वाटतं, असं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं.

महापालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च केल्याबाबत बापट यांची प्रतिक्रीयाः

दरम्यान, महापालिकेचे कोट्यवधी रुपये प्रभाग रचनेच्या गोंधळात गेले यावर विचारलं असता निवडणुकीसाठी किती खर्च आला याचा आकडा मला माहीत नसून आपलं शहर मोठं आहे आणि खर्च होणारच, मात्र अवास्तव खर्च झाला असेल, असं मला वाटत नाही, असं बापट म्हणाले. सत्ताधातात आल्यावर सत्तेचा उपयोग अथवा दुरुपयोग कसा करायचा हे त्या त्या वेळेच्या राज्यकर्त्यांवर अवलंबून असतं, असं देखील गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!