Share

Kalicharan Maharaj | हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली- कालीचरण महाराज

Published On: 

🕒 1 min read

बारामती : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक मुद्यांवरून चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकंच नाहीतर धर्म, राष्ट्र यांसारख्या विषयांवरही बोललं जात आहे. अशातच याचसंदर्भात आता धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली असल्याचं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

हिंदू धर्म वाचवायचा असेल, तर आपल्याला आपल्या भागातून हिंदुत्ववादी नेते राजकारणात निवडून दिले पाहिजेत. शत प्रतिशत मतदान हे हिंदूंना करावं लागणार आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना निवडून द्या. याची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली त्याचा मला आनंद आहे, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

दहशतवाद संपवण्यासाठी राजकारणाचे हिंदुत्ववादामध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. राजा म्हणजे आमदार, खासदार, जेवढा राजा हिंदुत्ववादी तेवढं हिंदू धर्माचे कल्याण होईल, असंही कालीचरण महाराज यांनी सांगितलं.

तसेच, धर्म वाचावण्यासाठी हिंदू वोटर बँक तयार करायला हवी. ती बनण्यासाठी त्याआधी जातीयवाद, धर्मवाद प्रांतवाद हे मुख्य अडथळे आहेत. हे वाद नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!