मुंबई : राज्याच्या राजकरणात सध्या महाभारत पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना देवेंद्र फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली तर शिवसेनेला डिवचण्याचं काम केलं. यावरुन शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी भाजप वर घणाघात केला.
सुषमा अंधारे यांचा भाजपला टोलाः
आताच्या कलियुगात देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथ रुपी कर्णला युद्धातून बाहेर काढलं, असं म्हणत शेलारांनी शिवसेनेला डिवचलं. यावरूनच सुषमा अंधारे यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस तर सत्ता प्रेमाने आंधळे झालेले कलयुगातील धृतराष्ट्र आहेत, अशी जहरी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच केवळ सत्तेसाठी भाजप अशा प्रकारची भाषा वापरत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
आशिष शेलार यांच्या बुद्धिमत्तेची मला किव वाटते:
आशिष शेलार यांच्या बुद्धिमत्तेची मला किव वाटते, असा घणाघात सुषमा यांनी केला आहे. त्यासोबतच आशिष शेलार, किरीट सोमवार ही मंडळी शकुनी मामाच्या भूमिका आलटून पालटून करतात, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्याः
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
