Share

Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी

Published On: 

🕒 1 min read

हैदराबाद : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वच नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल एमआयएमच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिम नेत्यांच्या आणि नागरिकांच्या योगदानाचे स्मरण आणि गौरव करण्यासाठी हैदराबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी केलेले भाषण सध्या चर्चेत आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले कि, “नेहमी म्हटलं जातं भारत-पाकिस्तानच्या फाळणीला केवळ मुस्लिमच जबाबदार आहेत. पण खरं तर फाळणीला मुस्लिम जबाबदार नाहीत. कारण ज्याचं पाकिस्तानवर प्रेम होतं ते त्याच वेळी तिकडे निघून गेले. त्यामुळे आता जे मुस्लीम भारतात आहेत त्यांचं भारतावर खूप प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम सदैव असंच राहणार आहे.” तसेच पुढे ते असेही म्हणाले, “महात्मा गांधींना नथुराम गोडसे याने गोळ्या घातल्या होत्या. कोणत्या मुस्लिम व्यक्तीने नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा देशाचे निष्ठावान नागरिक कोण आहेत?”, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ओवैसी म्हणाले की, “मोदी जी स्वातंत्र्यलढ्यात आमचाही तेवढाच वाटा आहे. अनेक मुस्लीम नेतेही स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदानही लक्षात ठेवा. तसेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक आवाहन करतो. गोर गरिब जनतेच्या कल्याणासाठी आपण सगळे एकत्र येऊया. अन्यायाविरोधात एकत्र लढूया. एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जाऊया. कारण आपल्या एकत्रितपणे भारताला पुढे घेऊन जायचं आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!