Share

Deepali Sayed : “ज्यांची हयात रस्त्यावर सभा घेऊन वाहतुकीचा…”, दिपाली सय्यद यांची मनसेवर टीका

Published On: 

मुंबई: मागील काही दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन राहावे लागत आहे. यावरून ठाण्याला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा संताप मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. यावरूनच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी टीका केली आहे.

ज्यांची हयात रस्त्यावर सभा घेऊन वाहतुकीचा जनतेला त्रास देण्यात गेली ते मनसे नेते ठाण्यातील वाहतुक कोंडी बाबत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे सल्ले देतात, त्याच आदरणीय शिंदे साहेबांच्या पायावर नाक रगडुन मनसे मंत्री पद मागत आहे. जाधवराव महामंडळासाठी हात जोडुन रांगेत दिसले.”, असा टोला दिपाली सय्यद यांनी लगावला आहे. 

दरम्यान ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनांची ये-जा सुरू असल्याने छेडानगर जंक्शनला वाहनांना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने २०१८ मध्ये छेडानगर सुधारणा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी तीन उड्डाणपूल आणि एका अंडरपासची उभारणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!