Share

Arvind Sawant | “शेवटी उपकराची जाणीव ठेवा”, शाहांच्या बैठकीनंतर सावंतांनी केली उपकाराची भाषा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक आगमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात होती. त्यादरम्यान, ज्यांनी धोका दिला त्यांना माफी नाही, असं शहा यांनी सांगितलं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी यासगळ्यावर भाष्य केलं आहे.

अरविंद सावंत यांचे वक्तव्य-

भाजपने शिवसेनेविरोधात आता थेट भूमिका घेतली आहे. मात्र, हे सर्व होत असले तरी भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे उपकाराची जाणीव ठेवा, असा सल्ला अरविंद सावंत यांनी भाजपला दिला आहे. अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

2019 च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. परंतू निकाल समोर आल्यानंतर लगेचंच हेच अमित शहा मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरलं असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे.

पुढे सावंत यांनी असंही सांगितलं की, एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही. भाजपानेच शिवसेनेला धोक्या दिला होता. त्यावेळी पट्टक देंगे म्हणणारे मातोश्रीवर आले आताही काही सांगता येत नाही,असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!