🕒 1 min read
मुंबई : गणेशोत्वह असल्यामुळे अनेकजण एकमेकांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. यामध्ये राज्यातील राजकीय नेतेही येतात. याच मुद्यावरून विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या टीकेला शिंदे गटाने चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. यावरून शिंदे गटाचा एकजुटपणा दिसून आला आहे.
शिंदे गटाचा अजित पवार यांच्यावर हल्ला-
याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. म्हस्के म्हणाले की,अजित पवार हे महाराष्ट्रातील फार मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या आयुष्यात एकदा ही संधी चालून आली होती. मात्र राष्ट्रवादीचे जास्त संख्येने आमदार असतानाही मोठ्या पवारसाहेबांनी ती संधी काँग्रेसला दिली. त्यानंतर त्यांनी एकदा पहाटे शपथविधी करुन उपमुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पवारसाहेबांनी त्यांचा डाव उलटवून लावला. त्यामुळे मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत त्यांच्या मनात आहे असं वाटतं.
एका सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ही सल त्यांना बोचत असावी. शिंदे मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. त्यामुळेच अजित पवारांनी श्रद्धेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच हेतूने त्यांनी टीका केली, असा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.
तसेच,मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोललो नाही तर माझं विरोधीपक्ष नेतेपद मोठे पवारसाहेब काढून घेतील ही भीती अजित पवारांना असावी म्हणून सुद्धा ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असावेत, असं म्हणत म्हस्केंनी चांगलाच अजित पवारांना टोला लागवला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | ‘सडक्या मेंदूचे’ म्हणणाऱ्या शिवसेनेवर आशिष शेलार यांचा पलटवार म्हणाले…
- Ambadas Danave | अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं – अंबादास दानवे
- Gopichand Padalkar | “शरद पवार साहेबच राज्यात राजकीय बदल करू शकतात…”, गोपीचंद पडळक यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
- Shahajibapu Patil | बार्शीत गौराई समोर साकारला शहाजीबापूंचा ओक्केत देखावा
- Sanjay Raut | संजय राऊत यांची न्यायालीन कोठडीत पुन्हा वाढ, ‘इतके’ दिवस लांबवली कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
