पुणे – देशात इंदिरा गांधी सरकारच्या काळात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली. आज त्या दिवसाला ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. सत्ता,स्वार्थ आणि अहंकार या पोटी जगातील सर्वात मोठ्या देशातील लोकशाहीची हत्या करण्यात आली तो आजचाच दिवस.रातोरात लादलेल्या आणीबाणीला विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष नेते व सत्याग्रहींना जेलमध्ये टाकण्यात आले. सर्व वर्तमानपत्राच्या कार्यालयाला टाळे लावले.नागरिकांचे मूलभूत अधिकारांवर गदा आणून न्यायलयाला मुखदर्शक बनवले गेले. एका परिवाराच्या विरोधात आवाज उठणाऱ्या जनतेला दाबण्यासाठी लोकशाहीची हत्या केली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
एकदोन नव्हे तर तब्बल 21 महिने भारतीय जनतेने हे सर्वकाही सहन केलं.इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ या कालावधीत लावलेल्या आणीबाणीच्या विरोधात अनेकांनी आंदोलन केले होते. तेव्हा अंतर्गत सुरक्षा प्रणाली अधिनियमाअंतर्गत लोकशाही चळवळीत सहभागी झालेल्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. अनेकजण त्यामुळे बेरोजगार झाले होते.जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांच्यासोबतच अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मोरारजी देसाई, मधु दंडवते, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान असे कितीतरी नेते गजाआड केले गेले. थोडेथोडके नाही, तर तीन लाखांवर नागरिक कारागृहात बंदी होते.
अनेक घरातील कर्ते-कमावते देशासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी कारागृहात असताना अनेक कुटुंबांची वाताहत होत होती. कुणाची संपत्ती जप्त करण्यात आली, तर कुणाला उद्योग-रोजगार संपुष्टात आल्याचा फटका बसला. एकूणच हा संपूर्ण कालखंड केवळ मानसिक नाही, तर आर्थिक शोषणाचासुद्धा होता. या हिटलरशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी देशाला दुसरा स्वातंत्र्यलढा लढावा लागला.
काँग्रेस जेव्हा-जेव्हा भाजपवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून हल्लाबोल करते त्या त्या वेळी भाजपकडून आणीबाणीची आठवण करून दिली जाते. याचे कारण लोकांचे मुलभूत अधिकार नाकारल्यानंतर एका अपंग व्यक्तीची जी अवस्था होऊ शकेल तिचं अवस्था अवघ्या देशाची झाली होती तशी आजची परिस्थिती नाही हे दाखवून देण्यासाठीच. आजच्या पिढीतील तरुणांना आणीबाणी म्हणजे काय हे ठावूक नसल्याने कोणत्याही सरकारी धोरणावर टीका करताना आणीबाणी या शब्दाचा वापर करतात मात्र नेमकी आणीबाणी काय होती हे त्याकाळचा अभ्यास केल्यानंतरच समजू शकेल. लोकशाहीचे त्याकाळात कशा पद्धतीने वस्त्रहरण करण्यात आले हे तरुण पिढीने समजून घेतले तर देशात पुन्हा आणीबाणी लावण्याची हिंमत कोणताही नेता किंवा सरकार कधी करू शकणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘…आम्ही एकत्र पुढे जाऊ’ ; पराभवानंतर कोहलीचे भावनात्मक ट्विट
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया


