Share

मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील

Published On: 

उस्मानाबाद : मराठवाड्याचा पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत असून मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त ते उस्मानाबादमध्ये आले होत. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, ‘कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना ठप्प होती. या ठप्प योजनेला आम्ही मान्यता दिली. या योजनेमुळे वाशी, उस्मानाबाद, कळंब आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी मिळेल. तसेच २०२४ च्या आधी भूम परांड्याला पाणी येईल. मागच्या भागात वळण बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल.’

मराठवाड्याला कृष्णा खोऱ्याचे काही प्रमाणात पाणी, वैनगंगेपासून नळ गंगेपर्यंत जाणाऱ्या प्रकल्पातून काही पाणी आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातून वळण बंधारे बांधल्याने त्यातून मिळणारे काही पाणी देण्याचे काम आमचे सरकार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्यात अतिरीक्त पाणी देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची माहितीही जयंत पाटील दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!