इंग्लंड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले.
डब्ल्युटीसी स्पर्धेच्या या अंतिम सामन्यात न्युझीलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने पहिल्या डावात २१७ धावांची मजल मारली. भारताकडुन उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर न्युझीलंडकडुन कायली जेमीसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या डावात २४९ धावांची मजल मारली. न्युझीलंडकडुन सलामीवीर डेवॉन कॉनवेने सर्वाधीक ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले.
पहिल्या डावात न्युझीलंडला निर्णायक ३२ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आश्वासक सुरुवात करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकही खेळाडू मोठी खेळी साकारण्यात अयशस्वी झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांवर अटोपला. यष्टीरक्षक रिषभ पंतने भारताकडुन सर्वाधीक ४१ धावांची खेळी साकारली. तर न्युझीलंडकडुन टीम साउथीने ४ गडी बाद केले. यासह चौथ्या डावात न्युझीलंडला सामना जिंकण्यासाठी १३९ धावांचे लक्ष्य होते. हे आव्हान न्युझीलंडने २ गडी गमावत सहज पुर्ण केले.
Better team won in the conditions. Deserved winners after the longest wait for a World Title. Classic example of Big things don't come easy. Well played, New Zealand. Respect.
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) June 24, 2021
या पराभवानंतर शास्त्रींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अशा परिस्थितीमधील अधिक चांगली टीम जिंकली. विश्वविजेपदासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर ते या विजेतेपदासाठी पात्र होते. मोठी गोष्ट सहज मिळत नाही, याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. न्यूझीलंडनं छान खेळ खेळला, रिस्पेक्ट.’ अशी प्रतिक्रिया ट्विट मधून दिलीआहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शासकीय कॉलेजच्या फी मध्ये ‘इतक्या’ हजारांची सूट !
- मानलं ‘टाटा’ ! जमशेदजी टाटा जगातील सर्वात दानशूर व्यक्ती
- ओबीसी समाजाला फसवणाऱ्या वडेट्टीवारांची हकालपट्टी करा; चित्रा वाघ यांची मागणी
- ‘पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प?’
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

